: मेजवानी कोलंबी खिचडी :
साहित्य :
* सोललेली कोलंबी 300 ग्रॅम्स
* बासमती तांदूळ 2 कप (400 ग्रॅम्स)
* बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम (150 ग्रॅम्स)
* आलं-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून
* लवंग 2 नग, दालचिनी 1 (एक इंच)
* जिरं 1/4 टीस्पून
* हिरवी मिरची 2 नग
* गरम मसाला पावडर दीड टीस्पून, तमालपत्र 2 पाने
* ओले खोबरे 2 टेबलस्पून (40 ग्रॅम्स)
* नारळाचे दूध 1 कप (250 मि.लि.)
* मीठ चवीपुरते
* तेल 3 टेबलस्पून
* तूप (वितळलेले) 2 टेबलस्पून.
कृती : कोलंबी धुऊन त्याला आले-लसणाची पेस्ट, हळद व मीठ लावून 15 मिनिटे बाजूला ठेवावे. तांदूळ धुऊन पाणी काढून टाकावे. एका पातेल्यात एक टेबलस्पून तूप गरम करून त्यात तमालपत्र, जिरे, लवंग, दालचिनी घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. बारीक चिरलेले कांदे त्यात लालसर होईपर्यंत परतावे. त्यावर ओले खोबरे घालून लालसर होईपर्यंत परतावे. त्यात धुतलेले तांदूळ घालून 2 मिनिटे परतावे. त्यात 3 कप उकळलेले पाणी व 1 कप नारळाचे दूध घालून तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. त्यात तूप, गरम मसाला, धुतलेली कोलंबी व चवीपुरते मीठ घालून परतावे. तांदूळ पूर्ण शिजवून घ्यावा. गरम गरम वाढावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दही मिसळ :
जिन्नस
- हिरवे मूग १ वाटी
- २ टोमॅटो, २ कांदे, २ बटाटे
- लसूण पाकळ्या ७-८, हिरव्या मिरच्या ५-६, आल्याचा छोटा तुकडा
- लाल तिखट दीड चमचा, धनेजीरे पूड दीड चमचा, गरम मसाला दीड चमचा
- थोडे दाण्याचे कूट, थोडा ओल्या नारळाचा खव
- मीठ, साखर, कोथिंबीर,
- तेल, मोहरी, हिंग, हळद
- पातळ पोह्यांचा चिवडा, शेव,
- दही, लिंबू १
मार्गदर्शन
जिन्नसः
हिरवे मूग १ वाटी
२ टोमॅटो
२ कांदे
२ बटाटे
लसूण पाकळ्या ७-८
हिरव्या मिरच्या ५-६
आल्याचा छोटा तुकडा
लाल तिखट दीड चमचा
धनेजीरे पूड दीड चमचा
गरम मसाला दीड चमचा
थोडे दाण्याचे कूट
थोडा ओल्या नारळाचा खव
मीठ
कोथिंबीर
तेल
मोहरी, हिंग, हळद
पातळ पोह्यांचा चिवडा
शेव
दही
लिंबू १
क्रमवार मार्गदर्शनः
हिरव्या मुगाची उसळ : हिरवे मूग सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री चाळणीत ओतून ठेवा म्हणजे पाणी निथळून जाईल. पाणी निथळण्याकरता चाळणीखाली एक ताटली ठेवा. चाळणीवर पूर्ण मूग झाकून जातील अशी एक ताटली ठेवा. सकाळी त्याला मोड आलेले दिसतील. दुपारी १२ ते १ च्या सुमारास जेवणाच्या वेळेस मोड आलेल्या कडधान्याची उसळ करा. मी हिरवे मूग वापरले आहेत. मटकी, हिरवे मूग व मटकी मिक्स आवडीप्रमाणे घ्या. मध्यम आचेवर छोटा कुकर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यात तेल घाला व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. त्यात चिरलेला अर्धा कांदा व टोमटो घालून थोडे ढवळा. नंतर त्यात मूग घाला. नंतर लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला व चवीपुरते मीठे घालून पूर्ण मूग भिजतील एवढे पाणी घालावे. नंतर थोडे ढवळून कुकरचे झाकण लावा व एक शिट्टी करा.
कांदे बटाट्याचा रस्सा : मध्यम आचेवर पातेले/कढई ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला व मोहरी, हिंग, हळद घालून लसूण आले व मिरचीचे वाटण घाला. ते थोडे फोडणीतच परतून घ्या. नंतर बटाटे व कांदे बारीक चिरून त्यात घाला. चवीपुरते मीठ घाला. अगदी थोडे दाण्याचे कूट व ओल्या नारळाचा खव घाला म्हणजे रस्सा दाट होईल. नंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवा. वाफेवर कांदे बटाटे शिजतील. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले ढवळा. आता थोडी आच वाढवा व पाहिजे असल्यास पाणी घाला. हा रस्सा थोडा पातळ असावा.
कांदा टोमॅटोची कोशिंबीर : टोमॅटो व कांद्याची लाल तिखट, मीठ व थोडी साखर घालून कोशिंबीर करा. त्यात थोडी कोथिंबीर घाला.
आता एका खोलगट डीशमध्ये आधी उसळ घाला. नंतर त्यावर कांदे बटाट्याचा रस्सा व कांदे टोमॅटोची कोशिंबीर घाला. नंतर त्यावर चिवडा, शेव, दही घाला. दह्यावर थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, व थोडे मीठ घाला. शोभेकरता थोडी चिरलेली कोथिंबीर घाला व खावयास द्या. यावर पाहिजे असल्यास थोडे लिंबूही पिळा. उसळ व रस्सा गरम पाहिजे.
टीपा :
पाटवड्यांची भाजी :
जिन्नस
- डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
- सुके खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची
- जिरे, मोहरी, तिखट, मीठ, गोडा व गरम मसाला -१-१ लहान चमचा
- तेल, पाणी
मार्गदर्शन
प्रथम बेसन एका परातीत काढून घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद व चमचाभर तेल टाकून थोडे थोडे पाणी घालून कणकेप्रमाणे मळून घ्यावे. (एकदम पाणी घालू नये. फार चिकट काम आहे). नंतर त्या उंड्याची शंकरपाळ्या प्रमाणे पोळी लाटून पोळपाटावर छोटे छोटे शंकरपाळे कापून पेपरवर पसरून ठेवावे.
गॅसवर एका पातेलीत ४-५ वाट्या पाणी उकळायला ठेवावे. सुके खोबऱ्याचा कीस भाजून घेऊन आले- लसूण, मिरची-जिरे सहित पेस्ट बनवून घ्यावी. कढईत तेलाची फोडणी करून त्यात हे वाटण टाकावे, जरा परतल्यावर, तेल सुटू लागताच तिखट, कांदा लसूण मसाला (अथवा गरम मसाला) घालावा. नंतर उकळते पाणी त्यात ओतावे. २ चमचे धनेपूड, मसाले, मीठ घालावे. रस्सा उकळू लागला की शंकरपाळी हळूहळू त्यात सोडावीत. ५-७ मिनीटे चांगली शिजली की कोथिंबीर पेरून झाकण टाकावे.
गरम गरम पाटोड्या, लिंबाची फोड, कांद्याची चकती व फुलक्यांबरोबर वाढाव्यात.
टीपा
सुरुवातीला जरी रस्सा पातळ वाटला तरी बेसनाने थोडा आळतो.
आवडत असल्यास एक कांदा भाजून वाटून लावू शकतो. टोमॅटो पण बारीक चिरून घालू शकता
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालवणी कोंबडी :
- कोंबडी १ किलो
- कांदे ७ नग (मध्यम)
- टोमॅटो १ नग (मध्यम)
- कोथिंबीर ४ टेबलस्पून
- हळद १ टी स्पून
- तिखट १ टेबलस्पून
- मालवणी मसाला १-१/२ टेबलस्पून (शीग लावून)
- तेल १ वाटी (आमटीची)
- सुक्या खोबऱ्याचा किस ५ टेबलस्पून (शीग लावून)
- आले १ इंच
- लसूण ७-८ पाकळ्या (मोठ्या आकाराच्या)
- मीठ चवीनुसार.
मार्गदर्शन
कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून, धुऊन, अर्धा तास निथळत ठेवावेत.
आलं लसूण वाटून घ्यावे.
६ कांदे गॅसवर भाजून घ्यावेत. कांदे साले न काढता, मध्यम आंचेवर, बाहेरील आवरण काळे पडे पर्यंत आणि कांदा शिजून मऊ होई पर्यंत भाजावेत.
१ कच्चा कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
सुक्या खोबऱ्याचा कीस मंद आंचेवर कोरडाच भाजून घ्यावा.
भाजलेल्या कांद्याची, काळी पडलेली, वरची साले काढून कांद्याचे ४-४ तुकडे करावेत. (शिजलेला कांदा किंचित बुळबुळीत होतो आणि सुरी सरकण्याची शक्यता असते. घाई नको. काळजी घ्यावी.) हे कांद्याचे तुकडे आणि भाजलेले खोबरे शक्य तितक्या कमी पाण्यात गंधा सारखे मुलायम वाटून घ्यावे.
पातेल्यात १ वाटी तेल ओतून मध्यम आचेवर तापावयास ठेवावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे.
कांदा गुलबट रंगावर आला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर (२ टेबलस्पून ) टाकून परतावे.
टोमॅटो शिजला की त्यावर कोंबडीचे तुकडे टाकून परतावे.
कोंबडीचे तुकडे साधारण ३-४ मिनिटे परतल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ आणि मालवणी मसाला टाकून परतावे. पाणी कमी असेल तर अगदी अर्धी वाटी पाणी टाकावे.
झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे.
कोंबडी शिजली की त्यात कांदा-खोबऱ्याची पेस्ट टाकून नीट मिसळून घ्यावे.
रस्सा दाटसरच राहील इतपत पाणी घालून रश्शाला, एखादी चांगली, उकळी आणावी. आणि आंच बंद करावी.
लज्जतदार, झणझणीत मालवणी कोंबडी तयार आहे.
टेबलवर घेण्याच्या वेळी वरतून, उरलेली (२ टेबलस्पून), कोथिंबीर भुरभुरावी. (कोथिंबीर टाकल्यावर झाकण ठेवू नये, कोथिंबिरीचा रंग उतरतो).
शुभेच्छा....!
टीपा
मालवणी कोंबडीचा रस्सा दाटसर असावा.
वर, तेलाचा किंचित तवंग असावा.
मालवणी कोंबडी तिखट असावी. (आवडी नुसार तिखटाची मात्रा वाढविण्यास हरकत नाही.)
याच प्रमाणात आणि पद्धतीत 'मालवणी मटण' बनवावे. फक्त मटण पूर्ण शिजल्याशिवाय कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकण्याची घाई करू नये.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाव बटाटा पॅटीस :
जिन्नस
- चिंचेची चटणी १ ते २ वाटया (चिंच, गुळ, तिखट, मिठ, धणे, जिरे पुड वापरुन केलेली.)
- सॅण्डविच ब्रेड १ लादी
- उकडलेले बटाटे ४ ते ५
- डाळीचे पिठ(बेसन) आवश्यकते नुसार
- तिखट, हळद, मिठ, चविनुसार
- ओवा चिमुटभर, खायचा सोडा २ चिमटी
- २ हिरव्या मिरची चे बारिक तुकडे
- तळण्यासाठी तेल
मार्गदर्शन
टीपा
- बटाट्याचे सारण मध्ये तुम्हाला आवडेल तो मसाला व घालून वेगळेपण आणू शकता.
- चिंचेची चटणी पॅटीस मध्ये आत घातल्याने बाहेरुन चटणी बरोबर खायची गरज भासत नाही.
- चिंचेची चटणी- चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घ्या. त्यात आवश्यकते नुसार गूळ साखर मीठ धणे जिरे पूड घालून गूळ वितळे पर्यंत उकळवा. चमकदार पणा आला की झाले
कांदा भजी :
जिन्नस
- ३ ते ४ कांदे उभे पातळ चिरून
- हळद १/२ चमचा
- कांदा लसूण मसाला किंवा तिखट २ चमचे
- आखे जिरे १/२ चमचा
- डाळीचे पीठ आवश्यकते नुसार
- २ ते ३ चमचे तांदळाचे पिठ
- गरम तेलाचे मोहन २ चमचे
- तळण्यासाठी तेल आवश्यकते नुसार
- मीठ चवीनूसार
मार्गदर्शन
१) सर्वप्रथम कांदा उभा पातळ चिरून घ्या. यात मीठ घालून कुस्करून झाकून बाजूला ठेवा. जेणे करून त्याला पाणी सुटेल.
२) ५ मिनिटांनी कांद्याला पणी सुटेल थोडे. आता यात कांदा लसूण मसाला हळद जिरे घालून मिक्स करून घ्या.
३) आता यात तांदळाचे पीठ घाला. मावेल एवढे बेसन (डाळीचे पीठ) घालून घोल तय्यार करा. कांद्याला जे पणी सुटेल तेच पणी पुरेसे आहे. जादाचे पणी चुकूनही घालू नका. घातल्यास भजी कुरकुरीत होणार नाहीत. नरम होतील.
४) कडईत तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यावर घोल मध्ये २ चमचे गरम तेलाचे मोहन घाला. छान मिक्स करा.
५) आता हे कांद्याचे मिक्स कडईतील तापलेल्या तेलात थोडे थोडे घेउन पसरून भजी सोडा.
६) दोनही बाजूंनी खरपूस तळा. कांद्याची कुरकुरीत भजी तय्यार आहेत. गरम गरमच टॉमेटो सॉस व पावा बरोबर सर्व्ह करा.
टीपा
- या भजीत सोडा घालायची गरज नाही.
- कांदा लसूण मसाल्यामुळे चव छान येते.
- ज्यांना लसूण आवडत नाही त्यांनी तिखट टाकावे.
- जशी कांदा भजी आपण गाडीवर खातो तशीच होईल.
- फोटो ची क्वालिटी खराब असल्या बद्दल क्षमस्व
बोंबिल फ्राय :
जिन्नस
- ७ -८ ताजे ओले बोंबिल
- मुथभर कोथिंबिर
- ८ -९ लसूण पाकल्या
- १ चमचा जीरे
- २ हिरव्या मिरच्या
- पाव चमचा हळद
- १ ते दिड चमचा लाल तिखट
- १ लिंबाचा रस
- तांदुळाची पिथी
- मीट
मार्गदर्शन
सर्वप्रथम बोंबिल दोन भाग करुन पोटाकडून अर्धवट कापुन घ्यावेत. साफ धुवून घ्यावेत.
कोथिंबिर, मिरची , लसुण, जीरे, याची गोळी मिक्सर मधून वाटून घ्यावी.
वाटलेली गोळी, हळद, तिखट, मिट, लिंबाचा रस,एकत्र करून बोंब्लाना लावून घ्या.
१५ मिनिटे मुरवत थेवा.
तापलेल्या तव्यावर तेल टाकून , तेल नीट तापल्यावर बोंबिल तांदुळच्या पिटी मध्ये घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
टीपा
बोंबिल पाट्याखाली थेवायची गरज नही , तांदुळाच्या पिथिने कुर्कुरित होतात
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टॉमेटो शोरबा :
जिन्नस
- टॉमेटो अर्धा किलो तुकडे करुन
- १ बटाटा तुकडे करुन
- आल्याच्या चकत्या
- लसुण पेस्ट
- साखर, मिठ चविनुसार
- पुदिना पाने
- तिखट (काश्मिरी मिर्ची चे असेल तर उत्तम) रंग चांगला येतो
- हिरवी मिरची तुकडे, कोथिंबिर
- तमालपत्र १,
- फोडणी साठी : ओवा १/२ चमचा व लसूण बारीक कापलेला १ चमचा, साजुक तुप
मार्गदर्शन
टीपा
- लसूण व ओव्याच्या फोडणी ची चव छान लागते. लसूण जरा गुलाबी सर करून घ्यावा...
- पावसाळ्यात असा गरम रसदार शोरबा पिण्याची मजाच काही और असते
सुकटची चटणी :
जिन्नस
- सुकट २ वाटि
- टोमेटो-१
- कान्दा-१
- लसुण-४ पाकळ्या
- हिरवि मिर्चि-१
- कोथिम्बिर चिरुन
- तिखट-१ चमचा
- हळ्द-१ लहान चमचा
- मिठ- चविनुसार
- तेल- १ पळि
- जिरे- १ लहान चमचा
मार्गदर्शन
राजमा :
जिन्नस
- राजमा १ वाटि
- कान्दे २ पातळ चिरुन
- टोमॅटो २ चिरुन
- जिरेपुड ४ चमचे, तिखट तुमच्या मनाप्रमाणे चविनुसार.
- गरम मसाला १ अर्धा चहाचा चमचा (ऑप्शनल)
- हिन्ग. हळद पाव चमचा, जिरे १ चमचा, ओवा चिमुट्भर
- मिठ चविनुसार.
- तेल आवश्यक्ते नुसार
- गरम पाणि १ वाटि
मार्गदर्शन
टीपा
जिन्नस
- बेसन पाव किलो
- मध्यम कांदे सहा
- सुके खोबरे पाऊण वाटी
- दाण्याचे कूट अर्धी वाटी
- लसूण पाकळ्या पंचवीस
- आमसुले १०
- तेल तीन पळ्या
- फोडणीचे साहित्य
- लोखंडी कढई
मार्गदर्शन
आमसुले पाव लिटर पाण्यात भिजवावीत.
कांदे मध्यम कापावेत.
सुके खोबरे जाड किसणीने किसून घ्यावे.
लसूण बारीक ठेचून घ्यावी .
लोखंडी कढईत तेल धुरावेपर्यंत तापवावे.
त्यात मोहरी, ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, दोन चिमटी मेथीदाणे, ते तडतडल्यावर ठेचलेली लसूण घालावी. ज्योत मोठी करावी. दहा सेकंदांनी लाल तिखट घालावे.
सर्व सारखे करून त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस आणि दाण्याचे कूट घालावे. तेल सुटायला लागल्यावर कांदा घालावा आणि सारखे करावे. गरजेनुसार मीठ घालावे.
खमंग वास यायला लागल्यावर आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. ते आळायला लागल्यावर बेसनमिश्रण घालून पटापट हलवावे.
ज्योत मोठीच ठेवून हे मिश्रण शक्य तेवढे आळवावे. मग मंद आचेवर हे साधारण अर्धा तास रटरटू द्यावे. दर दोन-तीन मिनिटांनी खसखसून हलवावे, अन्यथा खाली लागते.
मग ज्योत बंद करून साध्या भांड्यात काढावे. लोखंडी कढईतच गार केल्यास कळकते.
टीपा
(२) सोबत ज्वारीची कडंगलेली भाकरी असल्यास उत्तम.
टोमॅटोची चटणी :
जिन्नस
- टोमेटो ७ ते ८ चौकोनि चिरुन मध्यम आकाराचे.
- हिरवी मिरची आख्या ५ ते ६ मधे चिर देउन.
- फोड्णी साठि मोहरि, जिरे, हिन्ग, कलोन्जि, बडिशेप, मेथ्या ४ दाणे.
- साखर , मीठ चविनुसार
- लसुण मुठभर आखे.
- तेल
मार्गदर्शन
टीपा
गुजराथी कढी :
जिन्नस
- दहि ५०० ग्रम
- आल, कडीपत्ता, हिरवि मिर्चि चा ठेचा.
- बेसन पिठ २ ते ३ चमचे.,
- फोडणी : मेथि दाणे ४, मोहरी, हिन्ग, मिरे, दालचिनि तुकडा १, लवन्ग १, लाल मिर्चि २
- साखर किवा गुळ चविनुसार
- मिठ चविनुसार
मार्गदर्शन
टीपा
पालक-गाजर सूप :
जिन्नस
- चिरलेला पालक १ वाटी,
- एका गाजराचे तुकडे,
- १ मध्यम कांदा, २ टोमॅटो,
- ४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, मिरिचे दाणे ४-५
- २ चमचे लोणी.
मार्गदर्शन
१) लोणी गरम करून त्यात किसलेले आले, वाटलेली लसुण आणि कांदा परतउन घेणे.
२) मग त्यात टोमॅटोचे तुकडे, पालक, गाजरचे तुकडे व थोडे पाणी घालून , झाकण ठेवून शिजवून घेणे.
३) मिरिचे दाणे घालून, मिश्रण वाटणयंत्रातून बारिक वाटून घेणे.
४) हवे त्याप्रमाणे पाणी , साखर व मीठ चवीप्रमाणे घालून उकळणे.
गरम गरम पिणे. अतिशय रुचकर लागते.
टीपा
कोळंबी रस्सा :
जिन्नस
- कोळंबी - अर्धा किलो
- कांदे (मध्यम आकाराचे) - चार
- आमसुले - पंधरा
- आले-लसूण पेस्ट - एक मोठा चमचा
- नारळाचे घट्ट दूध - तीन वाट्या
- हळद, तिखट, मीठ
- तेल - एक डाव
मार्गदर्शन
कांदा मिक्सरमधून काढून घ्यावा.
आमसुले वाटीभर पाण्यात पंधरा मिनिटे भिजवावीत. मग आमसुले पिळून वेगळी करावीत.
तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करावी आणि हलक्या हाताने कांद्याची पेस्ट घालून हलवावी.
त्यात हळद, तिखट आणि आले-लसूण पेस्ट घालावी. ज्योत मोठी करावी.
कांदा गुलाबी/लाल झाल्यावर त्यात आमसुलाचे पाणी घालून सारखे करावे आणि नारळाचे दूध घालावे. एक उकळी आणावी.
त्यात कोलंबी घालून सारखे करावे. चवीपुरते मीठ घालावे. ज्योत बारीक करावी.
पाच ते सात मिनिटे झाल्यावर कोळंबी शिजल्याची खात्री करावी आणि ज्योत बंद करावी.
कोळंबी चटकन शिजते. आणि जास्त शिजवल्यास चामट होते.
टीपा
(२) कोळंबीला स्वतःची अशी एक चव असते. या रश्श्यात ती चव आल्या-लसणाने अधोरेखित होते. कोळंबीची अंगभूत चव झाकणारे कुठलेही घटक यात नसल्याने एरवी मसाल्यात बुडवलेली कोळंबी खाण्याची सवय लागलेल्या लोकांना हा रस्सा विचित्र वाटेल. त्यांनी या वाटेला जाऊ नये हेच बरे आणि खरे.
सुरमई रस्सा :
जिन्नस
- सुरमई अर्धा किलो
- कांदे तीन (मध्यम)
- आमसुले ८ ते १०
- गरम मसाला (तयार) २ चहाचे चमचे
- कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
- हळद, तिखट, मीठ
- तेल
- कोथिंबीर (ऐच्छिक)
मार्गदर्शन
सुरमई आणतानाच तिचे एक पेर जाडीचे काप करून आणावेत. (त्यात डोके वा शेपटाकडचा तुकडा नसावा) ते स्वच्छ धुऊन त्यांना हळद, लाल तिखट आणि थोडे मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.
कांद्यांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.
आमसुले एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे टाकून ठेवावीत.
कोकोनट मिल्क पावडरमध्ये साधारण दीड कप पाणी घालून गायीच्या दुधाइतके दाट/पातळ दूध करून घ्यावे.
दीड पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात कांद्याचा लगदा घालून मोठ्या आचेवर गुलाबी होईस्तोवर परतावा. त्यात आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. दोन मिनिटांनी सुरमईचे तुकडे घालावेत आणि हलक्या हाताने परतावे. गरम मसाला घालावा आणि परत एकदा हलवावे. ज्योत बारीक करावी. अंदाजाने मीठ घालावे.
पाच मिनिटांनी नारळाचे दूध घालून हलक्या हाताने ढवळावे. परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.
आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.
टीपा
(१) मासे दहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची गरज सहसा पडत नाही. दहा मिनिटांनी (नारळाचे दूध घातल्यावर पाच मिनिटांनी) एक तुकडा काढून कितपत शिजला आहे याचा अंदाज घ्यावा. जास्त शिजल्यास रश्श्याचे पिठले होईल.
(२) यासोबत साधा पांढरा भात (आंबेमोहोर वा कोलम) असल्यास उत्तम.
(३) हा रस्सा सुरमईच्या अंगभूंत चवीसाठी आणि नारळाच्या दुधाच्या कोवळ्या चवीसाठी करायचा आहे. त्यामुळे तो 'झणझणीत' वा 'मसालेदार' नाही याची कृपया नोंद घ्यावी
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुरमई रस्सा :
जिन्नस
- सुरमई अर्धा किलो
- कांदे तीन (मध्यम)
- आमसुले ८ ते १०
- गरम मसाला (तयार) २ चहाचे चमचे
- कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
- हळद, तिखट, मीठ
- तेल
- कोथिंबीर (ऐच्छिक)
मार्गदर्शन
सुरमई आणतानाच तिचे एक पेर जाडीचे काप करून आणावेत. (त्यात डोके वा शेपटाकडचा तुकडा नसावा) ते स्वच्छ धुऊन त्यांना हळद, लाल तिखट आणि थोडे मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.
कांद्यांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.
आमसुले एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे टाकून ठेवावीत.
कोकोनट मिल्क पावडरमध्ये साधारण दीड कप पाणी घालून गायीच्या दुधाइतके दाट/पातळ दूध करून घ्यावे.
दीड पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात कांद्याचा लगदा घालून मोठ्या आचेवर गुलाबी होईस्तोवर परतावा. त्यात आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. दोन मिनिटांनी सुरमईचे तुकडे घालावेत आणि हलक्या हाताने परतावे. गरम मसाला घालावा आणि परत एकदा हलवावे. ज्योत बारीक करावी. अंदाजाने मीठ घालावे.
पाच मिनिटांनी नारळाचे दूध घालून हलक्या हाताने ढवळावे. परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.
आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.
टीपा
(१) मासे दहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची गरज सहसा पडत नाही. दहा मिनिटांनी (नारळाचे दूध घातल्यावर पाच मिनिटांनी) एक तुकडा काढून कितपत शिजला आहे याचा अंदाज घ्यावा. जास्त शिजल्यास रश्श्याचे पिठले होईल.
(२) यासोबत साधा पांढरा भात (आंबेमोहोर वा कोलम) असल्यास उत्तम.
(३) हा रस्सा सुरमईच्या अंगभूंत चवीसाठी आणि नारळाच्या दुधाच्या कोवळ्या चवीसाठी करायचा आहे. त्यामुळे तो 'झणझणीत' वा 'मसालेदार' नाही याची कृपया नोंद घ्यावी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
टोमॅटो ची चटणी :
जिन्नस
- २ टोमॅटो
- २-३ हिरव्या मिरच्या
- २-३ लसूण पाकळ्या
- मीठ, साखर, जीरे पावडर चवीप्रमाणे
मार्गदर्शन
टोमॅटो गॅसवर भाजून घ्यावेत. हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्याव्या. टोमॅटो गार झाल्यावर त्याची साले व बीया काढून घ्यावीत व एका भांड्यात उरलेला गर काढावा. हिरव्या मिरच्या थोड्या ठेचून घाल्याव्यात.लसूण पाकळ्या ठेचून घाल्याव्यात. चवीप्रमाणे मीठ, साखर, जीरे पावडर घालावे. हे सर्व एकजीव करावे. जास्त तिखट आवडत असल्यास मिरच्या आणखी घाल्याव्यात.
टीपा
ही चटणी थोडी तिखट , थोडी आंबट असल्याने चवीला छान लागते.
मिक्सर मधून बारीक केली तरी चालते
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिरवी भाकरी :
जिन्नस
- ३ वाट्या बाजरीचे पीठ.
- ४-५ हिरव्या मिरच्या, आलं, एक टिस्पून ओवा, ३-४ पाकळ्या लसूण, मीठ, तेल