Monday, November 29, 2010

Marathi Mejwani / PakKala


: मेजवानी कोलंबी खिचडी :











साहित्य :
* सोललेली कोलंबी 300 ग्रॅम्स
* बासमती तांदूळ 2 कप (400 ग्रॅम्स)
* बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम (150 ग्रॅम्स)
* आलं-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून
* लवंग 2 नग, दालचिनी 1 (एक इंच)
* जिरं 1/4 टीस्पून
* हिरवी मिरची 2 नग
* गरम मसाला पावडर दीड टीस्पून, तमालपत्र 2 पाने
* ओले खोबरे 2 टेबलस्पून (40 ग्रॅम्स)
* नारळाचे दूध 1 कप (250 मि.लि.)
* मीठ चवीपुरते
* तेल 3 टेबलस्पून
* तूप (वितळलेले) 2 टेबलस्पून.


कृती : कोलंबी धुऊन त्याला आले-लसणाची पेस्ट, हळद व मीठ लावून 15 मिनिटे बाजूला ठेवावे. तांदूळ धुऊन पाणी काढून टाकावे. एका पातेल्यात एक टेबलस्पून तूप गरम करून त्यात तमालपत्र, जिरे, लवंग, दालचिनी घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. बारीक चिरलेले कांदे त्यात लालसर होईपर्यंत परतावे. त्यावर ओले खोबरे घालून लालसर होईपर्यंत परतावे. त्यात धुतलेले तांदूळ घालून 2 मिनिटे परतावे. त्यात 3 कप उकळलेले पाणी व 1 कप नारळाचे दूध घालून तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. त्यात तूप, गरम मसाला, धुतलेली कोलंबी व चवीपुरते मीठ घालून परतावे. तांदूळ पूर्ण शिजवून घ्यावा. गरम गरम वाढावे.


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


दही मिसळ :


जिन्नस

  • हिरवे मूग १ वाटी
  • २ टोमॅटो, २ कांदे, २ बटाटे
  • लसूण पाकळ्या ७-८, हिरव्या मिरच्या ५-६, आल्याचा छोटा तुकडा
  • लाल तिखट दीड चमचा, धनेजीरे पूड दीड चमचा, गरम मसाला दीड चमचा
  • थोडे दाण्याचे कूट, थोडा ओल्या नारळाचा खव
  • मीठ, साखर, कोथिंबीर,
  • तेल, मोहरी, हिंग, हळद
  • पातळ पोह्यांचा चिवडा, शेव,
  • दही, लिंबू १


मार्गदर्शन




जिन्नसः
हिरवे मूग १ वाटी
२ टोमॅटो
२ कांदे
२ बटाटे
लसूण पाकळ्या ७-८
हिरव्या मिरच्या ५-६
आल्याचा छोटा तुकडा
लाल तिखट दीड चमचा
धनेजीरे पूड दीड चमचा
गरम मसाला दीड चमचा
थोडे दाण्याचे कूट
थोडा ओल्या नारळाचा खव
मीठ
कोथिंबीर
तेल
मोहरी, हिंग, हळद
पातळ पोह्यांचा चिवडा
शेव
दही
लिंबू १

क्रमवार मार्गदर्शनः

हिरव्या मुगाची उसळ : हिरवे मूग सकाळी पाण्यात भिजत घाला. रात्री चाळणीत ओतून ठेवा म्हणजे पाणी निथळून जाईल. पाणी निथळण्याकरता चाळणीखाली एक ताटली ठेवा. चाळणीवर पूर्ण मूग झाकून जातील अशी एक ताटली ठेवा. सकाळी त्याला मोड आलेले दिसतील. दुपारी १२ ते १ च्या सुमारास जेवणाच्या वेळेस मोड आलेल्या कडधान्याची उसळ करा. मी हिरवे मूग वापरले आहेत. मटकी, हिरवे मूग व मटकी मिक्स आवडीप्रमाणे घ्या. मध्यम आचेवर छोटा कुकर तापत ठेवा. तो पुरेसा तापला की त्यात तेल घाला व मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा. त्यात चिरलेला अर्धा कांदा व टोमटो घालून थोडे ढवळा. नंतर त्यात मूग घाला. नंतर लाल तिखट, धनेजीरे पूड, गरम मसाला व चवीपुरते मीठे घालून पूर्ण मूग भिजतील एवढे पाणी घालावे. नंतर थोडे ढवळून कुकरचे झाकण लावा व एक शिट्टी करा.

कांदे बटाट्याचा रस्सा : मध्यम आचेवर पातेले/कढई ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात तेल घाला व मोहरी, हिंग, हळद घालून लसूण आले व मिरचीचे वाटण घाला. ते थोडे फोडणीतच परतून घ्या. नंतर बटाटे व कांदे बारीक चिरून त्यात घाला. चवीपुरते मीठ घाला. अगदी थोडे दाण्याचे कूट व ओल्या नारळाचा खव घाला म्हणजे रस्सा दाट होईल. नंतर त्यात पाणी घालून झाकण ठेवा. वाफेवर कांदे बटाटे शिजतील. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर घाला. चांगले ढवळा. आता थोडी आच वाढवा व पाहिजे असल्यास पाणी घाला. हा रस्सा थोडा पातळ असावा.

कांदा टोमॅटोची कोशिंबीर : टोमॅटो व कांद्याची लाल तिखट, मीठ व थोडी साखर घालून कोशिंबीर करा. त्यात थोडी कोथिंबीर घाला.

आता एका खोलगट डीशमध्ये आधी उसळ घाला. नंतर त्यावर कांदे बटाट्याचा रस्सा व कांदे टोमॅटोची कोशिंबीर घाला. नंतर त्यावर चिवडा, शेव, दही घाला. दह्यावर थोडे लाल तिखट, धनेजीरे पूड, व थोडे मीठ घाला. शोभेकरता थोडी चिरलेली कोथिंबीर घाला व खावयास द्या. यावर पाहिजे असल्यास थोडे लिंबूही पिळा. उसळ व रस्सा गरम पाहिजे.

टीपा :

ही मिसळ झणझणीत नसल्याने लहान मुले व आजीआजोबांनाही आवडते. हा एक पौष्टिक व पोटभरीचा पदार्थ आहे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाटवड्यांची भाजी :


जिन्नस

  • डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
  • सुके खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची
  • जिरे, मोहरी, तिखट, मीठ, गोडा व गरम मसाला -१-१ लहान चमचा
  • तेल, पाणी

मार्गदर्शन

प्रथम बेसन एका परातीत काढून घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद व चमचाभर तेल टाकून थोडे थोडे पाणी घालून कणकेप्रमाणे मळून घ्यावे. (एकदम पाणी घालू नये. फार चिकट काम आहे). नंतर त्या उंड्याची शंकरपाळ्या प्रमाणे पोळी लाटून पोळपाटावर छोटे छोटे शंकरपाळे कापून पेपरवर पसरून ठेवावे.

गॅसवर एका पातेलीत ४-५ वाट्या पाणी उकळायला ठेवावे. सुके खोबऱ्याचा कीस भाजून घेऊन आले- लसूण, मिरची-जिरे सहित पेस्ट बनवून घ्यावी. कढईत तेलाची फोडणी करून त्यात हे वाटण टाकावे, जरा परतल्यावर, तेल सुटू लागताच तिखट, कांदा लसूण मसाला (अथवा गरम मसाला) घालावा. नंतर उकळते पाणी त्यात ओतावे. २ चमचे धनेपूड, मसाले, मीठ घालावे. रस्सा उकळू लागला की शंकरपाळी हळूहळू त्यात सोडावीत. ५-७ मिनीटे चांगली शिजली की कोथिंबीर पेरून झाकण टाकावे.

गरम गरम पाटोड्या, लिंबाची फोड, कांद्याची चकती व फुलक्यांबरोबर वाढाव्यात.

टीपा

सुरुवातीला जरी रस्सा पातळ वाटला तरी बेसनाने थोडा आळतो.

आवडत असल्यास एक कांदा भाजून वाटून लावू शकतो. टोमॅटो पण बारीक चिरून घालू शकता

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मालवणी कोंबडी :


जिन्नस
  • कोंबडी १ किलो
  • कांदे ७ नग (मध्यम)
  • टोमॅटो १ नग (मध्यम)
  • कोथिंबीर ४ टेबलस्पून
  • हळद १ टी स्पून
  • तिखट १ टेबलस्पून
  • मालवणी मसाला १-१/२ टेबलस्पून (शीग लावून)
  • तेल १ वाटी (आमटीची)
  • सुक्या खोबऱ्याचा किस ५ टेबलस्पून (शीग लावून)
  • आले १ इंच
  • लसूण ७-८ पाकळ्या (मोठ्या आकाराच्या)
  • मीठ चवीनुसार.

मार्गदर्शन

कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून, धुऊन, अर्धा तास निथळत ठेवावेत.
आलं लसूण वाटून घ्यावे.
६ कांदे गॅसवर भाजून घ्यावेत. कांदे साले न काढता, मध्यम आंचेवर, बाहेरील आवरण काळे पडे पर्यंत आणि कांदा शिजून मऊ होई पर्यंत भाजावेत.
१ कच्चा कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
सुक्या खोबऱ्याचा कीस मंद आंचेवर कोरडाच भाजून घ्यावा.
भाजलेल्या कांद्याची, काळी पडलेली, वरची साले काढून कांद्याचे ४-४ तुकडे करावेत. (शिजलेला कांदा किंचित बुळबुळीत होतो आणि सुरी सरकण्याची शक्यता असते. घाई नको. काळजी घ्यावी.) हे कांद्याचे तुकडे आणि भाजलेले खोबरे शक्य तितक्या कमी पाण्यात गंधा सारखे मुलायम वाटून घ्यावे.

पातेल्यात १ वाटी तेल ओतून मध्यम आचेवर तापावयास ठेवावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे.
कांदा गुलबट रंगावर आला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर (२ टेबलस्पून ) टाकून परतावे.
टोमॅटो शिजला की त्यावर कोंबडीचे तुकडे टाकून परतावे.
कोंबडीचे तुकडे साधारण ३-४ मिनिटे परतल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ आणि मालवणी मसाला टाकून परतावे. पाणी कमी असेल तर अगदी अर्धी वाटी पाणी टाकावे.
झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे.
कोंबडी शिजली की त्यात कांदा-खोबऱ्याची पेस्ट टाकून नीट मिसळून घ्यावे.
रस्सा दाटसरच राहील इतपत पाणी घालून रश्शाला, एखादी चांगली, उकळी आणावी. आणि आंच बंद करावी.
लज्जतदार, झणझणीत मालवणी कोंबडी तयार आहे.
टेबलवर घेण्याच्या वेळी वरतून, उरलेली (२ टेबलस्पून), कोथिंबीर भुरभुरावी. (कोथिंबीर टाकल्यावर झाकण ठेवू नये, कोथिंबिरीचा रंग उतरतो).

शुभेच्छा....!

टीपा

मालवणी कोंबडीचा रस्सा दाटसर असावा.
वर, तेलाचा किंचित तवंग असावा.
मालवणी कोंबडी तिखट असावी. (आवडी नुसार तिखटाची मात्रा वाढविण्यास हरकत नाही.)

याच प्रमाणात आणि पद्धतीत 'मालवणी मटण' बनवावे. फक्त मटण पूर्ण शिजल्याशिवाय कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकण्याची घाई करू नये.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाव बटाटा पॅटीस :


जिन्नस

  • चिंचेची चटणी १ ते २ वाटया (चिंच, गुळ, तिखट, मिठ, धणे, जिरे पुड वापरुन केलेली.)
  • सॅण्डविच ब्रेड १ लादी
  • उकडलेले बटाटे ४ ते ५
  • डाळीचे पिठ(बेसन) आवश्यकते नुसार
  • तिखट, हळद, मिठ, चविनुसार
  • ओवा चिमुटभर, खायचा सोडा २ चिमटी
  • २ हिरव्या मिरची चे बारिक तुकडे
  • तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन

१) चिंचेची चटणी करून घ्या.
२) बटाटे उकडून मॅश करून घ्या व त्यात तिखट, हिरवी मिरची चे तुकडे, हळद, मीठ, व चाट मसाला घालून छान एकत्र करा. कोथिंबीर उपलब्ध असल्यास टाकू शकता.
३) बेसन मध्ये मीठ, तिखट, हळद, जिरे पूड, ओवा व पाणी घालून घोल तयार करा. त्यात खायचा सोडा व गरम तेलाचे मोहन २ चमचे घालून छान पैकी फेटून घ्या.
४) ब्रेड स्लाइस वर तयार बटाट्याचे सारण लावा. तर दुसरे स्लाइस वर चिंचेची चटणी लावा. एक मेकांवर ठेवून मधोमध कापून त्रिकोणी आकार द्या.
५) घोल मध्ये बुडवून गरम तेलात दोन्ही बाजूंनी तळून घ्या.
६) गरमा गरम पॅटीस मधोमध कापून कच्चा कांदा व मिरची बरोबर सर्व्ह करा.

टीपा

  • बटाट्याचे सारण मध्ये तुम्हाला आवडेल तो मसाला व घालून वेगळेपण आणू शकता.
  • चिंचेची चटणी पॅटीस मध्ये आत घातल्याने बाहेरुन चटणी बरोबर खायची गरज भासत नाही.
  • चिंचेची चटणी- चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घ्या. त्यात आवश्यकते नुसार गूळ साखर मीठ धणे जिरे पूड घालून गूळ वितळे पर्यंत उकळवा. चमकदार पणा आला की झाले
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

कांदा भजी :

जिन्नस

  • ३ ते ४ कांदे उभे पातळ चिरून
  • हळद १/२ चमचा
  • कांदा लसूण मसाला किंवा तिखट २ चमचे
  • आखे जिरे १/२ चमचा
  • डाळीचे पीठ आवश्यकते नुसार
  • २ ते ३ चमचे तांदळाचे पिठ
  • गरम तेलाचे मोहन २ चमचे
  • तळण्यासाठी तेल आवश्यकते नुसार
  • मीठ चवीनूसार

मार्गदर्शन

१) सर्वप्रथम कांदा उभा पातळ चिरून घ्या. यात मीठ घालून कुस्करून झाकून बाजूला ठेवा. जेणे करून त्याला पाणी सुटेल.

२) ५ मिनिटांनी कांद्याला पणी सुटेल थोडे. आता यात कांदा लसूण मसाला हळद जिरे घालून मिक्स करून घ्या.

३) आता यात तांदळाचे पीठ घाला. मावेल एवढे बेसन (डाळीचे पीठ) घालून घोल तय्यार करा. कांद्याला जे पणी सुटेल तेच पणी पुरेसे आहे. जादाचे पणी चुकूनही घालू नका. घातल्यास भजी कुरकुरीत होणार नाहीत. नरम होतील.

४) कडईत तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यावर घोल मध्ये २ चमचे गरम तेलाचे मोहन घाला. छान मिक्स करा.


५) आता हे कांद्याचे मिक्स कडईतील तापलेल्या तेलात थोडे थोडे घेउन पसरून भजी सोडा.

६) दोनही बाजूंनी खरपूस तळा. कांद्याची कुरकुरीत भजी तय्यार आहेत. गरम गरमच टॉमेटो सॉस व पावा बरोबर सर्व्ह करा.

टीपा

  • या भजीत सोडा घालायची गरज नाही.
  • कांदा लसूण मसाल्यामुळे चव छान येते.
  • ज्यांना लसूण आवडत नाही त्यांनी तिखट टाकावे.
  • जशी कांदा भजी आपण गाडीवर खातो तशीच होईल.
  • फोटो ची क्वालिटी खराब असल्या बद्दल क्षमस्व
-------------------------------------------------------------------------------------------------------

बोंबिल फ्राय :


जिन्नस

  • ७ -८ ताजे ओले बोंबिल
  • मुथभर कोथिंबिर
  • ८ -९ लसूण पाकल्या
  • १ चमचा जीरे
  • २ हिरव्या मिरच्या
  • पाव चमचा हळद
  • १ ते दिड चमचा लाल तिखट
  • १ लिंबाचा रस
  • तांदुळाची पिथी
  • मीट

मार्गदर्शन

सर्वप्रथम बोंबिल दोन भाग करुन पोटाकडून अर्धवट कापुन घ्यावेत. साफ धुवून घ्यावेत.

कोथिंबिर, मिरची , लसुण, जीरे, याची गोळी मिक्सर मधून वाटून घ्यावी.

वाटलेली गोळी, हळद, तिखट, मिट, लिंबाचा रस,एकत्र करून बोंब्लाना लावून घ्या.

१५ मिनिटे मुरवत थेवा.

तापलेल्या तव्यावर तेल टाकून , तेल नीट तापल्यावर बोंबिल तांदुळच्या पिटी मध्ये घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

टीपा

बोंबिल पाट्याखाली थेवायची गरज नही , तांदुळाच्या पिथिने कुर्कुरित होतात

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॉमेटो शोरबा :


जिन्नस

  • टॉमेटो अर्धा किलो तुकडे करुन
  • १ बटाटा तुकडे करुन
  • आल्याच्या चकत्या
  • लसुण पेस्ट
  • साखर, मिठ चविनुसार
  • पुदिना पाने
  • तिखट (काश्मिरी मिर्ची चे असेल तर उत्तम) रंग चांगला येतो
  • हिरवी मिरची तुकडे, कोथिंबिर
  • तमालपत्र १,
  • फोडणी साठी : ओवा १/२ चमचा व लसूण बारीक कापलेला १ चमचा, साजुक तुप

मार्गदर्शन

टॉमेटो चे तुकडे, बटाट्याचे तुकडे , आल्याच्या चकत्या, लसूण पेस्ट, साखर, मीठ, पुदिना पाने, तिखट, हिरवी मिरची तुकडे, तमालपत्र हे सर्व प्रेशर कुकर मध्ये १ ते २ शिट्टी देऊन शिजवून घ्या. गार करून कुस्करून गाळून घ्या. अगदी गरज भासली तरच थोडेसे गरम पाणी घाला. चव पाहून जास्त आंबट वाटले तर गरजे नुसार थोडीशी साखर व मीठ घाला. गॅसवर उकळवून त्यात कोथिंबीर घाला. आता वरून साजुक तुप कढल्यात तापवून बारीक कापलेला लसूण व ओव्याची फोडणी घालून हा शोरबा गरमा गरम सर्व्ह करा.

टीपा

  • लसूण व ओव्याच्या फोडणी ची चव छान लागते. लसूण जरा गुलाबी सर करून घ्यावा...
  • पावसाळ्यात असा गरम रसदार शोरबा पिण्याची मजाच काही और असते
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुकटची चटणी :


जिन्नस

  • सुकट २ वाटि
  • टोमेटो-१
  • कान्दा-१
  • लसुण-४ पाकळ्या
  • हिरवि मिर्चि-१
  • कोथिम्बिर चिरुन
  • तिखट-१ चमचा
  • हळ्द-१ लहान चमचा
  • मिठ- चविनुसार
  • तेल- १ पळि
  • जिरे- १ लहान चमचा

मार्गदर्शन


१.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी.
२.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे.
३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते. वरुन कोथिंबीर टाकून सर्व करावी. हि सुकटिची चटणी तांदुलाच्या भाकरीबरोबर खुप मस्त लागते.

टीपा
सुकट पाण्यात टाकण्याचे कारण - त्यात कधी कधी माती असते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राजमा :


जिन्नस

  • राजमा १ वाटि
  • कान्दे २ पातळ चिरुन
  • टोमॅटो २ चिरुन
  • जिरेपुड ४ चमचे, तिखट तुमच्या मनाप्रमाणे चविनुसार.
  • गरम मसाला १ अर्धा चहाचा चमचा (ऑप्शनल)
  • हिन्ग. हळद पाव चमचा, जिरे १ चमचा, ओवा चिमुट्भर
  • मिठ चविनुसार.
  • तेल आवश्यक्ते नुसार
  • गरम पाणि १ वाटि

मार्गदर्शन

प्रथम राजमा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावा. दुसरे दिवशी उकड्वून शिजवून घ्यावा. शिजविताना पाण्यात मिठ, ओवा, जिरे टाकावे.

आता कडई मधे तेल गरम करावे. हिंग चिमुटभर टाकून कान्दा घालावा. कांदा लालसर होईसतोपर्यंत परतावा.लालसर होत आला कि लगेचच टोमॅटो टाकून परतावा टोमॅटो मऊ होइस पर्यंत . मग हळद, तिखट, जिरेपुड मिठ टाकून हलवा १ मिनिट मग राजमा घालून मस्त परता. १ वाटी गरम पाणी घालून १ वाफ येउ द्या. म्हणजे सगळ मिळून येइल. शेवटी २ चिम्टी गरम मसाला घाला. खाली वर करुन घ्या.झाली भाजि.

भात किवा पोळी बरोबर खा.

टीपा

राजमा मध्ये कधिही जास्त मसाला चांगला लागत नाहि.असे माझी आई म्हणते..हि पद्ध्त सोपी जरी वाटली तरी फार चविष्ट आहे.
आवश्य करून पाहा आणि आपला अभिप्राय कळवा..:
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
झुणका :


जिन्नस

  • बेसन पाव किलो
  • मध्यम कांदे सहा
  • सुके खोबरे पाऊण वाटी
  • दाण्याचे कूट अर्धी वाटी
  • लसूण पाकळ्या पंचवीस
  • आमसुले १०
  • तेल तीन पळ्या
  • फोडणीचे साहित्य
  • लोखंडी कढई

मार्गदर्शन

बेसन एक लिटर पाण्यात घालावे. गुठळ्या मोडत त्याचे एकजीव मिश्रण करावे.
आमसुले पाव लिटर पाण्यात भिजवावीत.
कांदे मध्यम कापावेत.
सुके खोबरे जाड किसणीने किसून घ्यावे.
लसूण बारीक ठेचून घ्यावी .
लोखंडी कढईत तेल धुरावेपर्यंत तापवावे.
त्यात मोहरी, ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, दोन चिमटी मेथीदाणे, ते तडतडल्यावर ठेचलेली लसूण घालावी. ज्योत मोठी करावी. दहा सेकंदांनी लाल तिखट घालावे.
सर्व सारखे करून त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस आणि दाण्याचे कूट घालावे. तेल सुटायला लागल्यावर कांदा घालावा आणि सारखे करावे. गरजेनुसार मीठ घालावे.
खमंग वास यायला लागल्यावर आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. ते आळायला लागल्यावर बेसनमिश्रण घालून पटापट हलवावे.
ज्योत मोठीच ठेवून हे मिश्रण शक्य तेवढे आळवावे. मग मंद आचेवर हे साधारण अर्धा तास रटरटू द्यावे. दर दोन-तीन मिनिटांनी खसखसून हलवावे, अन्यथा खाली लागते.
मग ज्योत बंद करून साध्या भांड्यात काढावे. लोखंडी कढईतच गार केल्यास कळकते.

टीपा

(१) लोखंडी कढई नसल्यास साधी चालेल, पण चवीत फरक पडतो.
(२) सोबत ज्वारीची कडंगलेली भाकरी असल्यास उत्तम.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

टोमॅटोची चटणी :


जिन्नस

  • टोमेटो ७ ते ८ चौकोनि चिरुन मध्यम आकाराचे.
  • हिरवी मिरची आख्या ५ ते ६ मधे चिर देउन.
  • फोड्णी साठि मोहरि, जिरे, हिन्ग, कलोन्जि, बडिशेप, मेथ्या ४ दाणे.
  • साखर , मीठ चविनुसार
  • लसुण मुठभर आखे.
  • तेल

मार्गदर्शन

प्रथम कडईत तेल गरम करून त्यात मेथिदाणे, मोहरी टाका ति तडतडल्यावर, क्रमाक्रमाने जिरे, चुटकिभर हिंग, कलोंजि, बडिशेप टाका. आता लसुण, मिर्च्या टाकून परता. आता टोमाटो टाकून परता. साखर मिठ घालून परता. आता झाकण लावून मंद जाळावर मऊ शिजवा. पाणी टाकायची गरज नाहि. मीठ व साखरेमुळे पाणी सुटतेच... त्यामुळे पाणि घालायची गरज भासत नाहि.

टीपा

हि चटणी चपाती बरोबर मस्त लागते. फ्रिज मध्ये ४ दिवस टिकते खाउन उरली तर. हा हा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुजराथी कढी :


जिन्नस

  • दहि ५०० ग्रम
  • आल, कडीपत्ता, हिरवि मिर्चि चा ठेचा.
  • बेसन पिठ २ ते ३ चमचे.,
  • फोडणी : मेथि दाणे ४, मोहरी, हिन्ग, मिरे, दालचिनि तुकडा १, लवन्ग १, लाल मिर्चि २
  • साखर किवा गुळ चविनुसार
  • मिठ चविनुसार

मार्गदर्शन

दही मस्त फेटून घ्या. त्यात आल मिरची कडिपत्याचा ठेचा , मिठ, साखर मिक्स करा .. त्याला बेसन पिठ पण लावा व पाणी घालून ताक करून घ्या. आता हे मिश्रण. उंच पातेल्यात उकळी येईस तो पर्यंत तापवा...तापविताना एकसारख हलवत मात्र रहा.. ऊकळी आल्यावर गॅस मंद करून हलवत रहा.... हलविणे बंद केले तर ति फुटण्याची शक्यता असते...

दुसरी कडे पॅन मध्ये साजुक तुप तापल्यावर. मोहरी तडतड्वा मग क्रमाक्रमाने मेथी दाणे, हिंग, मिरे, दालचिनि, लवंग, आणि शेवटी लाल मिर्चि.... टाका.
हि फोडणी तयार कढी मध्ये टाकून ५ सेकंद झाकन लावा लगेचच हलवून एक उकळी आणून .... भाता बरोबर वाढा.

टीपा

हवी असल्यास हळद घालू शकता. गुजराथ मध्ये पांढरिच कढी करतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

पालक-गाजर सूप :


जिन्नस

  • चिरलेला पालक १ वाटी,
  • एका गाजराचे तुकडे,
  • १ मध्यम कांदा, २ टोमॅटो,
  • ४ लसूण पाकळ्या, १ इंच आले, मिरिचे दाणे ४-५
  • २ चमचे लोणी.

मार्गदर्शन

१) लोणी गरम करून त्यात किसलेले आले, वाटलेली लसुण आणि कांदा परतउन घेणे.

२) मग त्यात टोमॅटोचे तुकडे, पालक, गाजरचे तुकडे व थोडे पाणी घालून , झाकण ठेवून शिजवून घेणे.

३) मिरिचे दाणे घालून, मिश्रण वाटणयंत्रातून बारिक वाटून घेणे.

४) हवे त्याप्रमाणे पाणी , साखर व मीठ चवीप्रमाणे घालून उकळणे.

गरम गरम पिणे. अतिशय रुचकर लागते.

टीपा

अगदी बारिक वाटले की ह्याला कॉर्नफ्लोअरची गरज पडत नाही
---------------------------------------------------------------------------------------------------

कोळंबी रस्सा :


जिन्नस

  • कोळंबी - अर्धा किलो
  • कांदे (मध्यम आकाराचे) - चार
  • आमसुले - पंधरा
  • आले-लसूण पेस्ट - एक मोठा चमचा
  • नारळाचे घट्ट दूध - तीन वाट्या
  • हळद, तिखट, मीठ
  • तेल - एक डाव

मार्गदर्शन

कोळंबी स्वच्छ धुऊन घ्यावी.
कांदा मिक्सरमधून काढून घ्यावा.
आमसुले वाटीभर पाण्यात पंधरा मिनिटे भिजवावीत. मग आमसुले पिळून वेगळी करावीत.
तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करावी आणि हलक्या हाताने कांद्याची पेस्ट घालून हलवावी.
त्यात हळद, तिखट आणि आले-लसूण पेस्ट घालावी. ज्योत मोठी करावी.
कांदा गुलाबी/लाल झाल्यावर त्यात आमसुलाचे पाणी घालून सारखे करावे आणि नारळाचे दूध घालावे. एक उकळी आणावी.
त्यात कोलंबी घालून सारखे करावे. चवीपुरते मीठ घालावे. ज्योत बारीक करावी.
पाच ते सात मिनिटे झाल्यावर कोळंबी शिजल्याची खात्री करावी आणि ज्योत बंद करावी.
कोळंबी चटकन शिजते. आणि जास्त शिजवल्यास चामट होते.

टीपा

(१) सोबत आजऱ्याचा जिरग्या तांदळाचा भात किंवा ताजी तांदळाची भाकरी असल्यास परमानंद.
(२) कोळंबीला स्वतःची अशी एक चव असते. या रश्श्यात ती चव आल्या-लसणाने अधोरेखित होते. कोळंबीची अंगभूत चव झाकणारे कुठलेही घटक यात नसल्याने एरवी मसाल्यात बुडवलेली कोळंबी खाण्याची सवय लागलेल्या लोकांना हा रस्सा विचित्र वाटेल. त्यांनी या वाटेला जाऊ नये हेच बरे आणि खरे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुरमई रस्सा :

जिन्नस

  • सुरमई अर्धा किलो
  • कांदे तीन (मध्यम)
  • आमसुले ८ ते १०
  • गरम मसाला (तयार) २ चहाचे चमचे
  • कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
  • हळद, तिखट, मीठ
  • तेल
  • कोथिंबीर (ऐच्छिक)

मार्गदर्शन

सुरमई आणतानाच तिचे एक पेर जाडीचे काप करून आणावेत. (त्यात डोके वा शेपटाकडचा तुकडा नसावा) ते स्वच्छ धुऊन त्यांना हळद, लाल तिखट आणि थोडे मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.

कांद्यांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.

आमसुले एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे टाकून ठेवावीत.

कोकोनट मिल्क पावडरमध्ये साधारण दीड कप पाणी घालून गायीच्या दुधाइतके दाट/पातळ दूध करून घ्यावे.

दीड पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात कांद्याचा लगदा घालून मोठ्या आचेवर गुलाबी होईस्तोवर परतावा. त्यात आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. दोन मिनिटांनी सुरमईचे तुकडे घालावेत आणि हलक्या हाताने परतावे. गरम मसाला घालावा आणि परत एकदा हलवावे. ज्योत बारीक करावी. अंदाजाने मीठ घालावे.

पाच मिनिटांनी नारळाचे दूध घालून हलक्या हाताने ढवळावे. परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.

आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.

टीपा

(१) मासे दहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची गरज सहसा पडत नाही. दहा मिनिटांनी (नारळाचे दूध घातल्यावर पाच मिनिटांनी) एक तुकडा काढून कितपत शिजला आहे याचा अंदाज घ्यावा. जास्त शिजल्यास रश्श्याचे पिठले होईल.

(२) यासोबत साधा पांढरा भात (आंबेमोहोर वा कोलम) असल्यास उत्तम.

(३) हा रस्सा सुरमईच्या अंगभूंत चवीसाठी आणि नारळाच्या दुधाच्या कोवळ्या चवीसाठी करायचा आहे. त्यामुळे तो 'झणझणीत' वा 'मसालेदार' नाही याची कृपया नोंद घ्यावी

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुरमई रस्सा :

जिन्नस

  • सुरमई अर्धा किलो
  • कांदे तीन (मध्यम)
  • आमसुले ८ ते १०
  • गरम मसाला (तयार) २ चहाचे चमचे
  • कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
  • हळद, तिखट, मीठ
  • तेल
  • कोथिंबीर (ऐच्छिक)

मार्गदर्शन

सुरमई आणतानाच तिचे एक पेर जाडीचे काप करून आणावेत. (त्यात डोके वा शेपटाकडचा तुकडा नसावा) ते स्वच्छ धुऊन त्यांना हळद, लाल तिखट आणि थोडे मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.

कांद्यांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.

आमसुले एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे टाकून ठेवावीत.

कोकोनट मिल्क पावडरमध्ये साधारण दीड कप पाणी घालून गायीच्या दुधाइतके दाट/पातळ दूध करून घ्यावे.

दीड पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात कांद्याचा लगदा घालून मोठ्या आचेवर गुलाबी होईस्तोवर परतावा. त्यात आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. दोन मिनिटांनी सुरमईचे तुकडे घालावेत आणि हलक्या हाताने परतावे. गरम मसाला घालावा आणि परत एकदा हलवावे. ज्योत बारीक करावी. अंदाजाने मीठ घालावे.

पाच मिनिटांनी नारळाचे दूध घालून हलक्या हाताने ढवळावे. परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.

आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.

टीपा

(१) मासे दहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची गरज सहसा पडत नाही. दहा मिनिटांनी (नारळाचे दूध घातल्यावर पाच मिनिटांनी) एक तुकडा काढून कितपत शिजला आहे याचा अंदाज घ्यावा. जास्त शिजल्यास रश्श्याचे पिठले होईल.

(२) यासोबत साधा पांढरा भात (आंबेमोहोर वा कोलम) असल्यास उत्तम.

(३) हा रस्सा सुरमईच्या अंगभूंत चवीसाठी आणि नारळाच्या दुधाच्या कोवळ्या चवीसाठी करायचा आहे. त्यामुळे तो 'झणझणीत' वा 'मसालेदार' नाही याची कृपया नोंद घ्यावी

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

टोमॅटो ची चटणी :


जिन्नस

  • २ टोमॅटो
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • २-३ लसूण पाकळ्या
  • मीठ, साखर, जीरे पावडर चवीप्रमाणे

मार्गदर्शन

टोमॅटो गॅसवर भाजून घ्यावेत. हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्याव्या. टोमॅटो गार झाल्यावर त्याची साले व बीया काढून घ्यावीत व एका भांड्यात उरलेला गर काढावा. हिरव्या मिरच्या थोड्या ठेचून घाल्याव्यात.लसूण पाकळ्या ठेचून घाल्याव्यात‌. चवीप्रमाणे मीठ, साखर, जीरे पावडर घालावे. हे सर्व एकजीव करावे. जास्त तिखट आवडत असल्यास मिरच्या आणखी घाल्याव्यात.

टीपा

ही चटणी थोडी तिखट , थोडी आंबट असल्याने चवीला छान लागते.

मिक्सर मधून बारीक केली तरी चालते

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हिरवी भाकरी :

जिन्नस

  • ३ वाट्या बाजरीचे पीठ.
  • ४-५ हिरव्या मिरच्या, आलं, एक टिस्पून ओवा, ३-४ पाकळ्या लसूण, मीठ, तेल

मार्गदर्शन

हिरव्या मिरच्या, आलं, ओवा, लसूण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. त्यात दिड वाटी पाणी घालून नीट कालवून ते पाणी गाळून घ्यावे. त्या हिरव्या पाण्यात थोडे तेल आणि चवीनुसार मीठ, बाजरीचे पीठ घालून मळून पातळ भाकरी थापून भाजाव्यात.

टीपा

हिरव्या मिरच्या, आलं, ओवा, लसूण यांचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे
---------------------------------------------------------------------------------------------------------------